Advertisement

'डेली बेली २' चित्रपटात काम करण्यास वीर दास उत्सुक

१८ ऑक्टोबरला अॅमेझॉन प्राईमवर हा शो प्रदर्शित झाला. मुंबई लाइव्हनं या शो संदर्भात त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी वीर दासशी बातचित केली.

'डेली बेली २' चित्रपटात काम करण्यास वीर दास उत्सुक
SHARES

'डेली बेली', 'बदमाश कंपनी' आणि 'गो गोवा गॉन' आदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता वीर दास नं स्टँडिंग कॉमेडीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाची जादू अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मिळणार आहे. पण नुकताच वीर दास एक कॉमेडी शो घेऊन आला आहे. ज्याचं नावं आहे 'जेस्टिनेशन अननोन'. वीर दास या शोचा होस्ट असून तो या शोची निर्मिती देखील करत आहे. १८ ऑक्टोबरला अॅमेझॉन प्राईमवर हा शो प्रदर्शित झाला. मुंबई लाइव्हनं या शो संदर्भात त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी वीर दासशी बातचीत केली. शो, चित्रपट या व्यतिरिक्त वीर दास यानं वैयक्तिक आयुष्यावर देखील मुंबई लाइव्हसोबत गप्पा मारल्या

जेस्टिनेशन अननोन या शोचा फॉर्मेट काय आहे?

शोचा फाॅर्मेट खूप सिंपल आहे. ३ कॉमेडिअन एका नव्या शहरात जातात. त्यांच्याकडे ७२ तासांचा अवधी आहे. या दरम्यान ते स्थानिक कलाकारांना भेटून त्यांना सर्वात जास्त काय मजेशीर वाटतं हे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर शो चा सेटअप करण्यासाठी एक जागा शोधायची आहे. त्या शहराबद्दल काही मजेशीर जोक्स बनवायचे आहेत

अशा प्रकारचा शो बनवण्याची संकल्पना कशी सुचली?

मी कुठल्या ना कुठल्या कामासाठी वेगवेगळ्या शहरात फिरतो. त्या शहरात गेल्यावर मी तिथल्या लोकांचं, तिथल्या जागांचं निरिक्षण करतो. त्यावरून मला काही ना काही जोग सुचतातच. त्यावरूनच मला ही संकल्पना सुचली. जर एखादा कॉमेडिअन तिकडे तीन राहून त्या शहराला तिथल्या लोकांचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करू शकतो. तोच मजेशीर आणि काही तरी चांगलं लिहू शकतो

शो साठी भारतातल्या वेगवेगळ्या शहरात तुम्ही दौरे केला. या शहरांबद्दल तुमच्या मनात आधीपासून काही विचार होते का?

बॅग आणि कॅमेरा उचलायचा आणि कामाला लागायचं, असा हा शो आहे. शो साठी वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटत गेलो आणि ते आमच्या शो सोबत जोडले गेले. लखनऊमधील एका हास्य कवीसोबत आमची ओळख झाली आणि ते देखील आमच्यासोबत जोडले गेले. त्यामुळे हा स्क्रिप्टेड शो नाही. सर्व गोष्टी सहज होत गेल्या. जाणून बूजून घडवल्या गेलेल्या नाहीत.

चित्रपटांपासून तुम्ही चार हात लांब राहता, याचं काही खास कारण?

मला फक्त चित्रपटच करायचे नाहीत. तर मला बाकी गोष्टी देखील करायच्या आहेत. पण पुढच्या वर्षी माझे दोन चित्रपट येणार आहेत. त्यापैकी एका चित्रपटाचं नाव हंसमुख आहे. सध्या मी या चित्रपटाबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. हा पण एका वर्षात एक तरी चित्रपट करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन

डेली बेली चित्रपटाचा सिक्वल व्हावा अशी तुमची इच्छा आहे का?

डेली बेली चित्रपटाचा सिक्वल बनण्यासाठी माझी काही हरकत नाही. हा, पण डेली बेली चित्रपटाचा सिक्वल बनत असेल तर पहिल्यापेक्षा दमदार स्टोरी असली पाहिजे. जर स्टोरी दमदार असेल तर आम्ही सर्वच पुन्हा या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असू.

गेल्या काही वर्षात स्टँड-अप कॉमेडी या क्षेत्रात अनेक तरूण पुढाकार घेत आहेत. याबद्दल काय सांगाल?

कुठल्याही आर्ट-फॉर्मसाठी जास्तीत जास्त लोकांनी येणं हे चांगलंच आहे. यामुळे तो आर्ट-फॉर्म जास्त विकसित होतो आणि हे सर्व कॉमेडिअनसाठी चांगलंच आहे.

   


हेही वाचा

IRCTC च्या योजनेअंतर्गत 'हाऊसफुल ४'चं 'प्रमोशन ऑन व्हिल्स'

राजकुमार रावच्या बाईकची किंमत ऐकून धक्का बसेल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा