हस्तर पुन्हा येतोय

आता निर्माता सोहम शाहनं या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तुंबाडचा सिक्वल काढणार असल्याचं सांगितलं आहे.

SHARE

२०१८ च्या ऑक्टोबरमध्ये आलेल्या तुंबाडनं (Tumbbad) प्रेक्षकांचं मन जिकलं. तुंबाड पाहून आल्यानंतर त्याच जगात रेंगाळणाऱ्या प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले. हस्तरचं पुढे काय झाल? पांडुरंग नंतर काय करत असेल? असे अनेक प्रश्न भेडसावले. आता निर्माता सोहम शाहनं या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तुंबाडचा सिक्वल काढणार असल्याचं सांगितलं आहे.

सोहम शाह सध्या तुंबाड चित्रपटासाठी लेखकाच्या शोधात आहे. चित्रपटाच्या या भागातसुद्धा तुंबाडची काही पात्रं आणि हस्तर असणार आहेत. कथानकावर लवकरच काम सुरू होईल. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये चित्रपटाची शूटिंग होऊ शकते. सोहम शाह तुंबाड २ च्या शूटिंगसाठी फार उत्सुक आहे.

दहा वर्षांचा संघर्षाचा काळ ओलांडल्यानंतर ‘तुंबाड’ साकरण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा, मांडणी, ‘व्हीएफएक्स’चा वापर आदी सगळ्याच बाबतीत एक वेगळा प्रयोग असल्याचं दिसून येतं. लेखक नारायण धारप यांच्या कथेवर आधारित ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहताना प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राहिला. इतकंच नाही जसजसं कथानक पुढे सरकतं तसतशी या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढत गेली. त्यामुळे या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं. आता तुंबाडच्या मूळ कथेला लाभलेलं प्रेम या कलाकृतीला सुद्धा मिळतंय का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.'सर'कार' की सेवा में' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार 'हा' मराठी अभिनेता

खुशखबर! ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या नव्या सिरीजची घोषणा

संबंधित विषय
ताज्या बातम्या