'सर'कार' की सेवा में' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार 'हा' मराठी अभिनेता

'सर'कार' की सेवा में' या सिनेमाचं चित्रीकरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. हरिहरन ऐय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

SHARE

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आता पुन्हा एकदा अॅक्शन म्हणण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक म्हणून श्रेयस आपला दुसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सर'कार' की सेवा में' असं या चित्रपटाचं नाव आहे.

'सर'कार' की सेवा में' या सिनेमाचं चित्रीकरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्रेयससोबतच या सिनेमात श्रद्धा जैस्वाल, सुधीर पांडे, चेतना पांडे, ब्रिजेंद्र काला, सुशील सिंग यांच्या सहाय्यक भूमिका असतील.

२००८ साली आलेल्या 'सनई चौघडे'च्या माध्यमातून श्रेयसने निर्मितीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर त्यानं 'पोस्टर बॉईज' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. जो महाराष्ट्रामध्ये सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यानं 'बाजी' या चित्रपटातसुद्धा अभिनयाबरोबरच निर्मितीची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २०१७ साली पोस्टर बॉईजच्या हिंदी रिमेकद्वारे त्यानं दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या पेलणाऱ्या श्रेयसचा दिग्दर्शनातील हा दुसरा प्रयत्न किती यशस्वी होतो हे बघावं लागेल.हेही वाचा

असा आहे ‘गुलाबो सिताबो' चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक

'काटा लगा गर्ल'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री


संबंधित विषय
ताज्या बातम्या