Advertisement

सरकार महायुतीचंच येणार, भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्यानंतर राज्यातील जनतेने महायुतीच्याच बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचंच सरकार येणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सरकार महायुतीचंच येणार, भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा
SHARES

राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्यानंतर राज्यातील जनतेने महायुतीच्याच बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचंच सरकार येणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की,  राज्यात जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी प्रस्ताव पाठवल्यास भाजप विचार करेल.

हेही वाचा- महाराष्ट्रातील सरकारची ‘ही’ शेवटची डेडलाइन, पाणी आलं गळ्याशी?

त्याचप्रमाणे, भाजपच्या सर्व आमदारांनी विधिमंडळ नेता म्हणून एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. सर्वजण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर लवकरच तुम्हाला गोड बातमी ऐकायला मिळेल, असं सांगतानाच भाजपचा ‘प्लान बी’ देखील तयार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा-

आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज

मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा