शिवसेनेने ठरवलं तरच पर्यायी सरकार देता येईल- नवाब मलिक

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील निम्म्या वाट्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने आपली आडमुठी भूमिका न सोडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीचा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. यावर काहीही झालं तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

भाजपकडून इशारा

शिवसेनेने नमतं न घेतल्यास तसंच वेळेत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. तेव्हापासून राजकीय वर्तुळात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा- 'माझा आमदार माझा मुख्यमंत्री', मातोश्रीबाहेर पुन्हा लागले पोस्टर

काय म्हणाले मलिक?

'शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बसून मार्ग काढू. शिवसेनेने निर्णय घेतल्यास आम्ही पर्यायी सरकार देऊ शकतो', असं नवाब मलिक म्हणाले. 

दरम्यान, शरद पवार मुंबईत आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यानंतर बुधवारी किंवा गुरूवारी पुन्हा दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.


हेही वाचा-

मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत

प्रस्तावाशिवाय शिवसेनेला पाठिंबा देणार कसा? शरद पवारांची गुगली


पुढील बातमी
इतर बातम्या