कसला प्रस्ताव, जे ठरलंय ते करा, संजय राऊत यांनी पुन्हा ठणकावलं

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरलं होतं, त्याचा लेखी प्रस्ताव आधी द्या, तेव्हाच चर्चा करू, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला ठणकावलं आहे.

सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होणार असा विश्वास व्यक्त करताना शिवसेनेकडून प्रस्ताव आला पाहिजे, भाजपकडून चर्चेची दारं खुली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

तर, कुठल्याही क्षणी सत्तास्थापनेची गोड बातमी मिळू शकते. अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री बनविण्यावर चर्चा होऊ शकते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

या भूमिकेचं स्वागत करताना संजय राऊत म्हणाले की,

गेल्या १२ दिवसात भाजपकडून आलेलं हे पहिलंच समंजसपणाचं निवेदन आहे. निवडणुकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरलं तोच प्रस्ताव होता. त्यासाठी शिवसेनेकडून वेगळ्या प्रस्तावाची गरज काय? शहा यांनी राजमुद्रा उमटवलेल्या प्रस्तावाचीच अंमलबजावणी झाली पाहिजे. हा वनलाइन प्रस्ताव आहे. हाच प्रस्ताव भाजपनं लिखित द्यावा. मगच पुढची चर्चा होईल.

असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

सरकार महायुतीचंच येणार, भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

महाराष्ट्रातील सरकारची ‘ही’ शेवटची डेडलाइन, पाणी आलं गळ्याशी?


पुढील बातमी
इतर बातम्या