इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता; भाजपची राज ठाकरेंवर टीका

राज्यभरात विधानसभा निवडणूक सोमवार २१ ऑक्टोबर रोजी होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात प्रचारसभा घेत आहे. या सभेत राज ठाकरे भाजप-शिवसेने यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान राज यांच्या टीकेला भारतीय जनता पार्टीनं प्रत्युत्तर दिली आहे. भाजपा कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत आहे. रम्याचे डोस या काल्पनिक चित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करणारा रम्या आता कवितेच्या माध्यमातून विरोधकांची खिल्ली उडवित आहे. तसंच या कवितेच्या माध्यमातून भाजपनं राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

इंजिनदादा किती आवाज

'इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता, कोळसा किती जाळता अन् धूर किती काढता, रुळचं नाही खाली पण स्वभाव तुमचा हट्टी, जागच्या जागी धूसपूस करतात वाजवतात शिट्टी, डबे तुम्हाला सोडून जातात एकटे मागे उरतात, इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता, ''लाव रे तो व्हिडिओ'' म्हणता आणि लोक तिथे जमतात, तुमच्या नकला पाहून हसून टाळ्या देतात मात्र मत देत नाही', या  रम्याच्या कवितेच्या माध्यमातून भाजपनं राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

एकमेकांवर टीका

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीत नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. तसंच, भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी रम्या नावाचं काल्पनिक पात्र उभं केलं असून, त्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचं काम करण्यात येतं आहे.


हेही वाचा -

राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांच्या तिकीट दरात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या