Advertisement

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांच्या तिकीट दरात वाढ


दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांच्या तिकीट दरात वाढ
SHARES

दरवर्षी दिवाळनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांती संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावेळी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडाकडून जाद फेऱ्यांच नियोजन करण्यात येतं. परंतु यंदा एसटी मंडळानं जादा फेऱ्यांच नियोजन केलेलं नाही. त्यामुळं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रवाशांना गावी जाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्याच कारण म्हणजे एसटी महामंडळांन जादा गाड्यांचं नियोजन केलं नसल्यामुळं खासगी वाहतूकदारांनी वाढीव दरानं तिकीट आरक्षणास सुरुवात केली आहे.

गर्दीचं नियोजन

दिवाळीनिमित्त गावी जाण्याऱ्या प्रवाशांसाठी तसंच, गर्दीच्या नियोजनासाठी दादर, कुर्ला-नेहरुनगर, मुंबई सेंट्रल आणि परळ

आगारातून सुमारे ४०० विशेष एसटी फेऱ्या चालवण्यात येतात. यंदा दिवाळीत जादा एसटी फेऱ्यांबाबत अद्याप नियोजन करण्यात

आलेलं नाही. जादा वाहतुकीबाबत आगारांना लेखी सूचनाही देण्यात आल्या नसल्याची माहिती समोर येत आहे.


तिकीट आरक्षण

मुंबईतून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या खासगी वाहतूकदारांनी वाढीव दरानं तिकीट आरक्षणाला सुरुवात केली आहे.

त्यामुळं यंदा दिवाळीत एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.


निवडणकीच्या कामात व्यस्त

राज्यातील निवडणुकीच्या कामात एसटीतील बहुतांश कर्मचारी व्यस्त आहेत. यामुळे जादा वाहतुकीसह प्रवासी मित्र, गर्दी

व्यवस्थापन, संवेदनशील ठिकाणी ब्रेक डाऊन, एसटी स्वच्छता वाहनांची नियुक्ती करण्याचे कामही थंडावल्याची माहिती समोर

येत आहे.


जादा बस

यंदा एसटी महामंडळानं जादा बस न सोडल्यानं उत्पनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या ४

दिवसांमध्ये नियमित फेऱ्यांसह विशेष फेऱ्या देखील प्रवाशांनी भरून जातात. पाडवा झाल्यानंतर भाऊबीजेसाठी प्रवास

करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. मागील वर्षी दिवाळीत एसटीनं १०० कोटींची कमाई केली होती.हेही वाचा -

राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट

मेट्रो-४ प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला मनाई- उच्च न्यायालयRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा