Advertisement

मेट्रो-४ प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला मनाई- उच्च न्यायालय


मेट्रो-४ प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला मनाई- उच्च न्यायालय
SHARES

मेट्रो-४ प्रकल्पासह ठाण्यातील काही विकास प्रकल्पासाठी कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मार्गावरील ३ हजार ८८० झाडं तोडण्यात येणार होती. मात्र या वृक्षतोडीच्या निर्णयासाठी मनाई असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ३ डिसेंबरपर्यंत कायम ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं पर्यावरणप्रेमींना दिलासा मिळाला आहे. 

निर्णयाला आव्हान

वृक्षतोडीसंदर्भातील ठाणे वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी अॅड. अंकित कुलकर्णी यांच्यामार्फत जनहीत याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेली ही जनहित याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी ठाणे महापालिकेनं प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी मुदत मागितली.

उत्तर प्रतिज्ञापत्रावर दाखल

त्यानुसार, खंडपीठानं महापालिकेला मुदत देतानाच पालिकेच्या उत्तरावर याचिकादारांनीही आपले उत्तर प्रतिज्ञापत्रावर दाखल करावं असे  निर्देश देऊन पुढील सुनावणी ३ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. तसंच, तोपर्यंत झाडं तोडण्याचा आधीचा मनाई आदेश कायम राहणार असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं.हेही वाचा -

पीएमसीच्या माजी संचालकाला अटक

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरेRead this story in English
संबंधित विषय