पीएमसीच्या माजी संचालकाला अटक

दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कर्ज देणाऱ्या बँकेतील कमिटीवर अरोरा हे देखील सदस्य होते.

पीएमसीच्या माजी संचालकाला अटक
SHARES

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी पीएमसीच्या माजी संचालकाला अटक केली आहे. सुरजित सिंग अरोरा असे या संचालकाचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक आरोपींची संख्या पाचवर जाऊ पोहचली आहे. तर अटकेत असलेल्या 'एचडीआयएल' च’ वरियाम सिंग, संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांना २३ आँक्टोंबरपर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कर्ज देणाऱ्या बँकेतील कमिटीवर अरोर हे देखील सदस्य होते. या नियमबाह्य कर्ज देण्याच्या प्रक्रियेत अरोरा याचा ही हात असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

पोलिसांनी सुरूवातीला अरोरा यांच्या फोनवर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अरोरा यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून अरोरा यांचा माग काढत, त्यांना अटक केली. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघांचा ह्रदयविकाराने तर वर्सोवात डाँक्टर महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा