Advertisement

राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना डावलून उमेदवारीही नाकारली. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले खडसे यांना गळ लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.

राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट
SHARES

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले भाजपाचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यालाहेही वाचा  - विरोधी पक्ष नेतेपदाची ऑफर दिली होती. तसंच त्यांनी माझ्यासाठी एबी फॉर्मही आणला होता, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. भाजपा उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचार सभेत बोलताना खडसे यांनी राष्ट्रवादीच्या या ऑफरबद्दल सांगितलं. 

विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना डावलून उमेदवारीही नाकारली. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले खडसे यांना गळ लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र, खडसे यांनी पक्षातच राहणे पसंत केले. खडसे म्हणाले की, मागील काही वर्षात माझ्यावर अन्याय झाला. मात्र, भाजपाने मला राज्यात ओळख मिळवून दिली. पक्षामुळेच मी ६ वेळा आमदार, विरोधीपक्ष नेता झालो. मला गटनेतेपद आणि मंत्रीपदही मिळालं. त्यामुळे पक्षाला सोडून जाणं योग्य नाही. उमेदवारी रद्द होईल या भितीने काही जवळचे आमदार दूर गेले, अशी खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

मला उमेदवारी मिळणार नाही यांची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चादेखील झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली. पण  राज्यपाल बनून गप्प बसत जनतेला वाऱ्यावर सोडायचे का? असंही यावेळी खडसे म्हणाले.हेही वाचा  -

भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे

अबब! मंत्र्यांच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा