Advertisement

अबब! मंत्र्यांच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ

यंदा विद्यमान १८ मंत्र्यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना या मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्ती जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्राचा आणि गेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा अभ्यास प्रजा फाउंडेशनने केला आहे.

अबब! मंत्र्यांच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ
SHARES

राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या संपत्तीत डोळे विस्फरतील एवढी वाढ मागील पाच वर्षात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील १८ मंत्र्यांच्या संपत्तीत पाच वर्षात १४२ कोटी ५० लाख रुपयांची वाढ झाली आहे. प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान १८ मंत्र्यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना या मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्ती जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्राचा आणि गेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा अभ्यास प्रजा फाउंडेशनने केला आहे. त्यानुसार या मंत्र्यांच्या संपत्तीत ५ वर्षात ८० टक्के वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे.  या मंत्र्यांची संपत्ती २०१४ मध्ये १७९ कोटी ८० लाख होती. आता  ही संपत्ती ३२२ कोटी ५० लाख रुपयांवर गेली आहे. 

भ्रष्टाचारातून किंवा गैरकारभारातून मंत्र्यांची संपत्ती वाढली असं म्हणता येणार नाही.  कायदेशीर मार्गाने तसंच मालमत्तेची किंमत वाढल्यामुळेही संपत्ती वाढू शकते, असं प्रजा फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद म्हसकर यांनी म्हटलं आहे.  पुण्यातील कोथरुडमधील भाजपचे उमेदवार  चंद्रकांत पाटील यांची २०१४ मध्ये ३ कोटी २ लाख एवढी पाटील यांची संपत्ती होती. ती आता २९ कोटी ३ लाख रुपये झाली आहे. परतूर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपत्तीत सर्वाधिक २७ कोटी १० लाखांची वाढ झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, अशोक उईके, राम शिंदे, संजय कुटे आणि जयकुमार रावल यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे.   सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती ७ कोटी ५० लाखावरून ११ कोटी ६० लाख रुपयांवर गेली आहे.

या मंत्र्यांची वाढली संपत्ती


बबनराव लोणीकर (पाणीपुरवठामंत्री) 
२०१४ मधील संपत्ती २ कोटी ३० लाख
२०१९ मधील संपत्ती २९ कोटी ४० लाख
 

पंकजा मुंडे (महिला बालविकासमंत्री) 
२०१४ मधील संपत्ती १३ कोटी ७० लाख
२०१९ मधील संपत्ती ३५ कोटी ४० लाख


सुभाष देशमुख (सहकार मंत्री) 
२०१४ मधील संपत्ती ३१ कोटी ९० लाख
२०१९ मधील संपत्ती ४८ कोटी ५० लाख


जयदत्त क्षीरसागर ( रोजगार हमीमंत्री) 
२०१४ मधील संपत्ती ४४ कोटी ७० लाख
२०१९ मधील संपत्ती ५७ कोटी ७० लाखहेही वाचा -

गँगस्टर इक्बाल मिर्चीशी कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल

राज ठाकरे नकलाकार, उद्धव हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार- रामदास आठवले
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा