गँगस्टर इक्बाल मिर्चीशी कुठलाही संबंध नाही- प्रफुल्ल पटेल

मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन हिच्यासोबत पटेल कुटुंबियांनी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.

SHARE

मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन हिच्यासोबत पटेल कुटुंबियांनी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.

कुख्यात डाॅन दाऊद इब्राहीमचा हस्तक इक्बाल मिर्ची याला जमीन व्यवहारात मदत केल्याप्रकरणी पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने चाैकशीची नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेत्यांनी याप्रकरणी पटेल यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.

काय खुलासा?

यावर खुलासा करताना पटेल यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, मुंबईतील ज्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे, ती जागा पटेल कुटुंबाने १९६३ साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली होती. १९७० साली या जागेवर इमारत बांधण्यात आली, त्यात पटेल कुटुंबातील २१ सदस्य रहात होते. परंतु कौटुंबिक वादातून हे प्रकरण न्यायालयात गेलं. १९७८ साली ही जागा कोर्ट रिसिव्हरने ताब्यात घेतली. पुढं सीजे हाऊसच्या मागच्या जागेत अतिक्रमण झालं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ताबेदाराला या मालमत्तेत जागा देण्याचे आदेश दिले. ही जागा ताबेदाराने नंतर हजरा मेमन हिला विकली. महापालिकेने सीजे हाऊसला धोकादायक ठरवल्यानंतर मिलेनीयर डेव्हलपरने तिथं पुनर्विकास सुरू केला. या व्यवहारात पटेल कुटुंबाने मेमन कुटुंबासोबत कुठलीही भागीदारी किंवा व्यवहार केला नाही, असा खुलासा पटेल यांनी केला.

तसंच ईडीकडून आपल्याला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. ईडीने चौकशीसाठी बोलवल्यास चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले.  हेही वाचा-

पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडीच्या निशाण्यावर

प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींत वाढ, ईडीने दुसऱ्यांदा बजावलं समन्ससंबंधित विषय
ताज्या बातम्या