पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडीच्या निशाण्यावर

पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोटेट केलेली कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात हा जमिनीचा व्यवहार झाला होता. त्या कागदपञांवर पटेल यांच्या स्वाक्षरी ही आहेत.

SHARE
मुंबईत शिखर बँक घोटाळ्यामुळे ईडीच्या निशाण्यावर आलेल्या पवार कुटुंबियांनंतर कुख्यात गुंड दाऊदचा हस्तक  इक्बाल 'मिर्ची'ला जमीन व्यवहारात मदत केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंञी प्रफुल पटेल अडचणीत आले आहे. या घोटाळ्या प्रकरणी ईडीने आता प्रफुल पटेल यांना 18 आँक्टोंबर रोजी ईडी कार्यालाच चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावला आहे.

 प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. 2007 मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. मूळात प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोटेट केलेली कंपनी  मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात हा जमिनीचा व्यवहार झाला होता. त्या कागदपञांवर पटेल यांच्या स्वाक्षरी ही आहेत. माञ हा व्यवहार 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं. “2004 रोजी इक्बाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इक्बाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना दिली.

 कालांतराने इक्बाल  हा आपल्या कुटुंबियांसोबत लंडनमध्ये स्थायिक झाला. 2013 मध्ये इक्बाल उर्फ मिर्चीचा मृत्यू झाला. दरम्यान ठरलेल्या व्यवहारानंतर पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलली कंपनी मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून दोन प्लॅट देण्यात आले होते. हे प्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहेत. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव 'सीजे हाऊस' असे ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणी ईडीने मुंबई आणि बेंगळुरूमध्ये ११ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात कागदपत्रांसोबत डिजिटल पुरावे, ई-मेल असे महत्त्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले. ईडीने या प्रकरणात १८ लोकांची साक्ष ही नोंदवली आहे. संबंधित जागा पटेल कुटुंबीयांच्या मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इक्बाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती, असा महत्त्वाचा पुरावा ईडीला मिळाला आहे. त्या पार्श्वभूमिवरच ईडीने 18 आँक्टोंबरला  या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रफुल पटेल यांना बोलवले आहे. तसा समन्सच ईडीने पटेल यांना पाठवला आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या