राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा रद्द, मनसैनिकांचं लक्ष आता पुढच्या सभेकडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिलीच प्रचारसभा पावसाच्या राड्यामुळे रद्द झाली आहे.   

मंगळवारी रात्री पाऊस झाल्यानंतर सभेचं ठिकाण असलेल्या पुण्यातील नातू बाग येथील मैदानात चिखल आणि पाणी साचलं होतं. परंतु सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी लागलीच वाळू आणि माती टाकून मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला.  

परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनुसार बुधवारी संध्याकाळी देखील पाऊस पडला. यामुळे कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. पुण्यातील सभा रद्द झाली असली तरी गुरूवारी गोरेगाव आणि वांद्रे इथं राज ठाकरे यांच्या २ सभा होणार आहेत. 

ईडीच्या कारवाईपासून शांत असलेले राज ठाकरे काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे राजकीय जाणकारांसोबतच मनसैनिकांचं लक्ष लागलं होतं. परंतु पावसाने या सर्वांच्या उत्सुकतेवर पाणी फेरलं.


हेही वाचा-

मी ब्ल्यू फिल्म बनवत नाही, राज ठाकरेंच्या उत्तराने हास्यकल्लोळ!

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा


पुढील बातमी
इतर बातम्या