Advertisement

मी ब्ल्यू फिल्म बनवत नाही, राज ठाकरेंच्या उत्तराने हास्यकल्लोळ!

आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. सोमवारी वांद्र्यातील एमआयजी क्लब इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला.

मी ब्ल्यू फिल्म बनवत नाही, राज ठाकरेंच्या उत्तराने हास्यकल्लोळ!
SHARES

आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. सोमवारी वांद्र्यातील एमआयजी क्लब इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ५ ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. यावेळी पक्षाकडून  २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही ब्लू प्रिंट सादर करणार का? असा प्रश्न विचारण्याऐवजी एका पत्रकाराने ब्ल्यू फिल्म असा उच्चार केल्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.  

नेमकं काय झालं?

राज ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातार यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी राज यांना काही प्रश्न देखील विचारले. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार? मनसेत देखील इनकमिंग सुरू झालं काय? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना “मी रोज ४-५ नावं सांगत जाईल तसंच इतके दिवस जे बोललो नाही ते लवकरच बोलेल,” असं राज म्हणाले.

'असं' विचारणं बरं नाही

त्यानंतर राज तिथून निघत असताना एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारताना ‘ब्लू प्रिंटऐवजी…’ ब्ल्यू फिल्म असा शब्द उच्चारल्याने सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर राज ठाकरे यांनीही लगेच ‘मी ब्लू फिल्म नाही करत.,’ असं मिश्किल उत्तर दिलं. ‘मला ब्लू प्रिंट म्हणायचं होतं,’ अशी सावरासावर पत्रकाराने करताच राज यांनी ‘कॅमेरांसमोर असं विचारणं बरं दिसत नाही,’ असं म्हणत त्याला चिमटा काढला. यावेळी राज यांनाही हसू थांबवता आलं नाही. 


हेही वाचा-

मनसेचं इंजिन चार्ज, राज ठाकरेंनी केले २ उमेदवार जाहीर

ईडीच्या चौकशीपासून राज ठाकरे बोलायचे कमी झालेत- अजित पवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा