ईडीच्या चौकशीपासून राज ठाकरे बोलायचे कमी झालेत- अजित पवार

कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया (ED)ने चौकशी केल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बोलायचं कमी झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

SHARE

काय म्हणाले होते राज ठाकरे? 

राज ठाकरे यांची कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने तब्बल साडेआठ तास चौकशी केली होती. या चौकशीत त्यांनी ‘ईडी’ला काय उत्तरं दिली ते माहीत नाही. परंतु चौकशीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ‘माझी कितीही चौकशी करा, माझं तोंड बंद होणार नाही.’ असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र त्यांची चौकशी झाल्यापासून ते बोलायचे कमी झाल्याचं पवार म्हणाले. 

चौकशीची भीती 

सध्या विरोधी पक्षातील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या मागचं कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआय आणि ईडीच्या चौकशांची भीती दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत, असं पवार म्हणाले.हेही वाचा-

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर

पलटवार! आता मनसेनं पाठवली ‘ईडी’ला नोटीससंबंधित विषय
ताज्या बातम्या