Advertisement

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा


आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा
SHARES

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेतआदित्य यांच्या निमित्तानं ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरताना आदित्य ठाकरे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून पदयात्रा काढणार आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीला मनसेनं पाठिंबा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

अप्रत्यक्षरीत्या मदत

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. त्याशिवाय, मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनी दुसऱ्या यादीत वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं राज ठाकरे वरळीत मनसेचा उमेदवार न देऊन आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या मदत करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवाराची घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिली २७ उमेदवार आणि दुसरी ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वरळी मतदारसंघातील उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं येत्या काळात राज ठाकरे वरळी मतदार संघातील उमेदवाराची घोषणा करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



हेही वाचा -

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

वरळीतील 'केम छो वरळी’ फ्लेक्स अखेर उतरवले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा