Advertisement

वरळीतील 'केम छो वरळी’ फ्लेक्स अखेर उतरवले


वरळीतील 'केम छो वरळी’ फ्लेक्स अखेर उतरवले
SHARES

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 'ठाकरे' कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. आदित्य यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं मराठीसह इतर भाषिक मतदारांना आकर्षित करणारे फलक वरळी परिसरात लावले होते. याव्यतीरिक्त या ठिकाणी 'केम छो वरळी' असा सवाल करणारे गुजराती आणि तेलगू भाषेतले देखील फलक लावण्यात आले होते. मात्र फ्लेक्सवर आक्षेप घेताच ते उतरविण्यात आले. 

मतदारांना आकर्षित

वरळी मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी या भागात ठिकठिकाणी 'केम छो वरळी' असा सवाल करणारे गुजराती तसेच तेलगू भाषेतील फ्लेक्स लावण्यात आले होते. परंतु, या फ्लेक्सवरून नागरीकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरील ही टीका लक्षात घेत काही तासातच हे फ्लेक्स उतरविण्यात आले.

सोशल मीडियावर टीका

दरम्यान वरळी परिसरात हे फ्लेक्स नेमके कुणी लावले होते, यावरून शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं होतं. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातूनच हे फ्लेक्स लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. केवळ गुजरातीच नव्हे तर तेलगू आणि तमिळ भाषेतले बॅनरही वरळीत लावण्यात आले होते.



हेही वाचा -

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

महात्मा गांधी जयंती २०१९ : बापूंच्या या '१२' गोष्टी जगासमोर उजागर झाल्या नाहीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा