Advertisement

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत


मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkarयांनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला आहेमातोश्री’ या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उमेदवारी मिळणार का ?

नितीन नांदगावकर यांच्या पक्षप्रवेशावेळी वरुण सरदेसाई उपस्थित होतेनितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार का, याकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहेनितीन नांदगावकर यांना मनसेचे संभाव्य उमेदवार मानलं जात होतं. मात्र, नितीन यांच्या सेनाप्रवेशानं मनसेच्या गोटात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

२ याद्या जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन नांदगांवकर यांना उमेदवारी मिळेल शक्यता वर्तवली जात होती. परंतु, मनसेनं आतापर्यंत २ उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नितीन नांदगावकर यांच नाव नाही. परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत. नितीन नांदगावकर हे आपल्या फेसबुक पेजवर अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात.



हेही वाचा -

मनसेची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत उमेदवार

नितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमधून लढण्याची तयारी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा