आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm Uddhav Thackery) हे दुसऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरं जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर २ दिवस हिवाळी अधिवेशन ( winter session 2020) बोलवण्यात आलं आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत तेही अवघे २ दिवसांचे अधिवेशन होणार असून यामध्ये ६ अध्यादेश आणि १० विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधिवेशनात चर्चेला केवळ सहा तास मिळणार आहेत. त्यात १० विधेयकावर चर्चा शक्य नाही, असा दावा करून महाविकास आघाडी सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांच्या आरोपावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्लीत भरथंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत, ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत नाही. ‘अन्नदाता को देशद्रोही कहनेवाले इंसान कहने के लायक नहीं है’ असा टोला त्यांनी खास हिंदी भाषेतून लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसध्येला सह्याद्री अतिथीगृह इथं सरकारनं चहापानाच्या ठेवलेल्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रम झाल्यावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.

अधिवेशनात गाजणारे मुद्दे?

  • मराठा आरक्षणाचा प्रश्नही अजून सुटलेला नाही. यावरून विरोधक आक्रमक पवित्रा घेतील.
  • अवकाळी मुसळधार पाऊसामुळे झालेलं नुकसान
  • कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप
  • मोफत वीज आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दाही विरोधकांकडून मांडण्यात येईल
  • महिला व बालकांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी बहुचर्चित ‘शक्ती’ बिल मांडण्यात येणार


हेही वाचा

कुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिकेत शिवसेनाच, मनसेला टोला

दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती- शिवसेना

पुढील बातमी
इतर बातम्या