Advertisement

कुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिकेत शिवसेनाच, मनसेला टोला

महापालिका निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असतानाच कुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहील, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.

कुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिकेत शिवसेनाच, मनसेला टोला
SHARES

मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राजकीय जुवळाजुवळीसोबतच दावे-प्रतिदाव्यांना देखील सुरूवात झालेली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (mns) सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असतानाच कुणी कुणाबरोबरही गेलं तरी महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहील, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.

नाशिकच्या दौऱ्यावर गेलेले संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईसोबतच नाशिक महापालिका देखील शिवसेनेच्याच ताब्यात असेल असा दावा केला. 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपचा धुव्वा उडवला. या निवडणुकांमधील रणनिती साफ चुकल्याची कबुली देखील विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यातच येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेत (bmc) शिवसेना विरूद्ध भाजप असा उभा संघर्ष होणार असला, तरी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळू शकते असं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्यास भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- मनसेचा जन्म मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठीच!

या सर्व चर्चेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्यावर विचारविनिमय सुरू आहे. महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकत्र आल्यास निकाल आमच्याच बाजूने लागण्याची शक्यता अधिक आहे. परंतु चर्चेअंतीच अंतिम निर्णय घेण्यात येईल. सद्यस्थितीत मुंबई महापालिकेत शिवसेना (shiv sena) पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून नाशिकमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीनंतरही या महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहतील, असा विश्वाय संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजप-मनसे युतीबाबत विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले, हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल. कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहील. तर नाशिकमध्येही शिवसेनेचाच दबदबा असेल, असा टोला मनसेचं नाव न घेता लगावला.

(shiv sena mp sanjay raut slams mns over alliance with bjp in bmc election)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा