उद्धव ठाकरेंची राज्यातील १८ प्रमुख नेत्यांशी चर्चा

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं सहकार्य महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत संवाद साधत आहेत. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी दुपारी राज्यातील राज्यातील १८ प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माकप, भाकप, एमआयएम आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांचाही सहभाग आहे. तर, राज्य सरकारकडून या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होत आहेत.

हेही वाचा - ‘राज्यात अघोषित आणीबाणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

बुधवारी १२३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक झाल्याचं वक्तव्य केंद्रीय कुटुंबकल्याण आणि आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं होतं.

महाराष्ट्रातील ३६ जिल्यांपैकी ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. राज्यांत कोरोनाचे जवळपास १०२६ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर इथली परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल.

केंद्र सरकारचं वैद्यकीय पथक आणि डॉक्टर्स मुंबईत आहेत. महाराष्ट्रात एकही नवीन रुग्ण आढळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून हवी ती मदत केली जाईल, असंही हर्षवर्धन म्हणाले होते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी केली लष्कराकडे ‘ही’ मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या