Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

‘राज्यात अघोषित आणीबाणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करून प्रसारमाध्यमांची गळचेपी करू पहात आहे. राज्यात एकप्रकारची आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असं फडणवीस म्हणाले.

‘राज्यात अघोषित आणीबाणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
SHARES

राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करून प्रसारमाध्यमांची गळचेपी करू पहात आहे. राज्यात एकप्रकारची आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा,अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार २८ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली. 

काय म्हणाले फडणवीस?

राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन आल्यावर राजभवनच्या बाहेर उभं राहून देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आपल्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाने नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर चाललाय.

हेही वाचा- वांद्रे गर्दी प्रकरण: विनय दुबे जामिनावर बाहेर

पहिल्यांदा ज्याप्रकारे एबीपी माझाच्या वार्ताहाराला अटक करण्यात आली. त्यानंतर टाइम्स नाऊच्या सीनियर एडिटरवर कारवाई करा म्हणून क्राइम ब्रांचला पत्र देण्यात आलं. सोमवारी ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना जवळपास १२ तास चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आलं. अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांना देखील हे सरकार इतका वेळ बसवून ठेवत नाही. त्यांना फिरण्याकरीता पासेस देतं. अशा प्रकारे दबावतंत्राचा वापर केला जात आहे. 

एकीकडे वृत्तपत्र वाटप करायला सरकार परवानगी देत नाही. सोशल मीडियावर सरकारच्याविरूद्ध एक जरी शब्द लिहिला तरी पोलीस त्याला पकडतात, माफी मागायला लावतात. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्याचं काम या सरकारकडून चाललेलं आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आबाधित राहावं, तशा प्रकारचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी राज्यपालांना केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. 

यावेळी फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या शिफारसीवर तातडीने कार्यवाही करा, मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा