Advertisement

मुख्यमंत्र्यांनी केली लष्कराकडे ‘ही’ मागणी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांना सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली लष्कराकडे ‘ही’ मागणी
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सरकारकडून सर्वोपतरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी हाॅस्पीटल बेड्सची उपलब्धता करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांना सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 

हेही वाचा - परप्रांतीय कामगारांची यादी बनवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध होण्यासाठी रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये व संस्थांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध करण्याचं काम सुरू आहे. तसंच राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. परदेशातूनही नागरिक परतायला लवकरच सुरुवात होणार आहे. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागू शकते. इतर वैद्यकीय सुविधाही लागतील हे गृहीत धरून शासन नियोजन करत आहे. त्यादृष्टीकोनातून लष्कर, रेल्वे, पोर्ट ट्रस्टला देखील विनंती करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा - मजुरांना तिकीटांत ८५ टक्के सवलत? असा आदेशच मोदी सरकारने काढलेला नाही- अनिल देशमुख




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा