Advertisement

मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटींची मदत

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे.

मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटींची मदत
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. राज्यातील जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालके आणि कार्पोरेट हाऊसेस यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

कोरोनाशी लढतांना राज्यातील लहानथोर मंडळी शासनासमवेत मदतकार्यात उतरली असून या संकटाचा सामना करत आहेत. चौधरी यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असोत किंवा आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणारी राज्यातील बालके असोत, शासनाला या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांच्या दातृत्वाला मला मनापासून सलाम करावा वाटतो. या सर्वांच्या सहकार्याने, स्वंयशिस्तीचे आणि नियमांचे कडक पालन करुन आपण कोरोनाला नक्की हरवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा