भाजप करतंय हिंदू धर्म बदनाम करण्याचा काम, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

भाजप अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करत असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यंदाची आषाढी वारी पायी होऊ देण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यावरून सावंत यांनी भाजपला (bjp) टोला हाणला आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात मुघलांचं सरकार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिलेली असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही, असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी सरकारला दिला. 

भाजपचा हिंदू धर्मातील तत्त्वांशी संबंध नाही, तर भाजप अध्यात्मिक आघाडीचा अध्यात्माशी संबंध नाही. यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही. हे सर्व असत्याचे पुजारी आहेत. पायी वारीबद्दल होत असलेल्या मागणीमागे राजकारण आहे. हे लोकं वारकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत त्यांना वारकऱ्यांच्या आरोग्याशी काहीही देणंघेणं नाही. 

हेही वाचा- केंद्राच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस मिळत नाही, हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत वारी करतात, परंतु गेल्या वर्षापासून कोरोनाच्या (coronavirus) संसर्गामुळे लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत. असं असलं तरी गेल्या वर्षी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत वारी सोहळा साजरा करून परंपरा खंडित होऊ दिली नाही.

वारीमध्ये केवळ वारकरी नव्हे, तर भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्यामुळं याही वर्षी राज्य सरकार वारकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेईल. मात्र  पायीच वारी करा असा आग्रह करून वारकऱ्यांचं तसंच, स्थानिकांचं आरोग्य धोक्यात घालण्याचा या मंडळींचा उद्योग दिसत आहे, असा आरोप सचिन सावंत (sachin sawant) यांनी केला आहे.

राजकारण व अध्यात्म परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपा या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपा अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा करतेय. अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला आहे.

(maharashtra congress leader sachin sawant criticized bjp over ashadhi wari )

हेही वाचा-  ४५ दिवस उलटूनही घरकामगार, रिक्षा चालकांना पॅकेज नाही- चंद्रकांत पाटील
पुढील बातमी
इतर बातम्या