Advertisement

केंद्राच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस मिळत नाही, हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसीचे दीड कोटी डोस उपलब्ध करून दिले नाहीत, असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

केंद्राच्या धमक्यांमुळेच महाराष्ट्राला लस मिळत नाही, हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप
SHARES

केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसीचे दीड कोटी डोस उपलब्ध करून दिले नाहीत, असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. एवढंच नाही, तर केंद्र सरकारने तंबी दिल्यामुळेच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेल्याचा दावा देखील त्यांनी केला. 

ग्रामविकास विभागाने शिवराज्य दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये ‘शिवशक राज्यदंड स्वराज्य गुढी’ उभारण्याचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी नगरमधील कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, सध्याच्या स्थितीत केंद्र सरकार ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करत असून केंद्राने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदार राज्यांवर ढकलली आहे. हे काही बरोबर नाही. 

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल शंभर पार, काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात पेट्रोल पंपांवर आंदोलन

राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर ग्लोबल टेंडर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी दाखवली. पण कोणतीही कंपनी आमच्यासोबत बोलण्यासाठी तयार नाही. केंद्र सरकारशी बोलू असं कंपन्या सांगत आहेत. केंद्राने संपूर्ण लसीकरणाचं नियत्रंण आपल्या हातात घेण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाची जबाबदारी राज्यावर न टाकता केंद्र सरकारनेच ती स्वीकारावी व लसीकरण करून महाराष्ट्राला भयमुक्त करावं, असं हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटने राज्याला जूनपासून दीड कोटी लसी देण्याचं ठरवलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्राकडून तंबी देण्यात आल्यानंतर सीरमचे सीईओ अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले. एकीकडे राज्यांना लसीकरण करायला लावायचं आणि दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही, असा आरोपही हसन मुश्रीफ यांनी केला.

(ncp leader hasan mushrif blames central govt for not getting covid 19 vaccine in maharashtra )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा