अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

थकवा व अंगात कणकण असल्यानं मागील २ दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले महाविकास आघाडीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू होता. लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. 

हेही वाचा - पहाटे शपथ घेताना तुम्हाला राष्ट्रवादी चालते, मग मला का नाही?- एकनाथ खडसे

काही दिवसांपूर्वीच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. 'देवगिरी' निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते.

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. केवळ खबरदारी म्हणून घरात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पार्थ म्हणाले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.


हेही वाचा -

महाविकास आघाडीने राखलं आरेचं जंगल- उद्धव ठाकरे

खडसे आल्याने कुणीही नाराज नाही- शरद पवार


पुढील बातमी
इतर बातम्या