ठरलं! राज ठाकरे शपथविधीला जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी संध्याकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत असल्याने हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरातील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. परंतु सर्वांचं लक्ष लागलं आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीकडे. राज ठाकरे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी सूत्रांची माहिती आहे. 

हेही वाचा- अशोक चव्हाणांच्या अडचणीत वाढ, 'आदर्श' घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी

उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज ठाकरेंना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण स्वीकारून राज ठाकरे सायंकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही, हे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं नसलं, तरी ते या सोहळ्याला आवर्जून येतील, असं म्हटलं जात आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज ठाकरे आपले चुलत बंधू उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतील, असं म्हटलं जात आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून १ लाख शिवसैनिक येण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय विविध राज्याचे मुख्यमंत्री, पक्षाचे प्रमुख नेते, ४०० शेतकरी कुटुंबीयांना देखील शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.


हेही वाचा-

म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!

शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमित्रंण


पुढील बातमी
इतर बातम्या