महाराष्ट्र क्रांती सेना लढवणार विधानसभेच्या १०० जागा!

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर रान उठवणारी महाराष्ट्र क्रांती सेना विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०० जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी केली. 

राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना पाटील म्हणाले, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या जवळपास ६० विविध संघटनांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण १० जागांवर महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार उभे करण्यात येतील.

विधानसभा निवडणुकीत १० जागा देण्याचं आश्वासन भाजप, शिवसेनेने दिलं होतं. परंतु मागील ८ दिवस पाठपुरावा करूनही सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे १० जागा न मिळाल्यास १०० जागा लढवण्याची तयारी केल्याचंही पाटील म्हणाले.


हेही वाचा-

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?

राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का, भास्कर जाधव शिवसेनेत


पुढील बातमी
इतर बातम्या