राज्यमंत्रीमंडळ विस्तारात ३६ मंत्री घेणार शपथ ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात ३६ मंत्री शपथ घेतील असं बोललं जात आहेत. यामध्ये ८ राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारात शिवेसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३-१३ मंत्री तर काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. शिवेसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसच्या ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.  मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून सर्वच पक्षाच्या आमदारांनी लॉबिंग सुरू केलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण कालच दिल्लीत दाखल झाले असून काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची ते भेट घेणार आहेत. 

अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा खात्यासाठी इच्छुक असल्याचं समजतं. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील, अमित देशमुख, के. सी. पाडवी आणि विश्वजीत कदम यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत कळतं. शिवसेनेकडून रामदास कदम, अॅड. अनिल परब, निलम गोऱ्हे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, अब्दुल सत्तार, भास्कर जाधव आणि दीपक केसरकर यांची तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धर्मरावबाबा आत्राम, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, भारत भालके आणि हसन मुश्रीफ यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. 


हेही वाचा -

शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा

केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही- अमृता फडणवीस


पुढील बातमी
इतर बातम्या