Advertisement

शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा

शरद पवारांच्या या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठींबा दिला आहे. 'मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे.

शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा
SHARES

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नक्षलवादाशी संबंध नसलेल्यांवर झालेल्या कारवाईप्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांच्या या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठींबा दिला आहे. 'मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे. नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचं पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे'. असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

राज्य कार्यकारिणीची बैठक

एल्गार परिषदेनंतर पुण्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही याबाबत माहिती दिली. 'मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे. नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचे पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषद याचा काहीही संबंध नाही. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा', असं म्हटलं

तरुणांना भडकवण्याचं काम

'सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत मुस्लिम समाजाला भडकविण्याचं काम कम्युनिस्ट पक्ष आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष करत आहेत,' असा आरोप आठवले यांनी केला. 'राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी निर्णय झाल्यानंतर मुस्लिम समाजानं शांतता राखली. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे मुस्लिम समाजातील तरुणांना भडकवण्याचं काम करत आहेत; पण मुस्लिम समाजानं शांतता राखावी. हे कायदे देशातील मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत', असं रामदास आठवले यांनी म्हटलं.



हेही वाचा -

केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही- अमृता फडणवीस

कचऱ्याच्या डब्यात धुतले चहाचे कप, व्हिडीओ व्हायरल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा