Advertisement

केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही- अमृता फडणवीस


केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही- अमृता फडणवीस
SHARES

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानप झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ट्विटरवर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेकदा त्यांना ट्विटरवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अशातच, पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही' अशी टीका केली आहे.

विधानाचा समाचार

'माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही' असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, 'केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.

कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार

'खरं आहे देवेंद्र फडणवीसजी त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानंही कोणी ठाकरे होत नाही त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं एखाद्यानं स्वतःचं कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते' असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग देखील केलं आहे. दरम्यान, अमृता फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

घणाघाती प्रत्युत्तर 

अमृता यांच्या या टीकेला ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’, अशा शब्दांमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिलं आहे. 'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!’ असं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी ‘आजच्या आनंदीबाई’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.


हेही वाचा -

एसटी महामंडळात कापड घोटाळ्याची चर्चा?

CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा