बिनचेहऱ्याच्या जातीयवादी नेत्यांना राज ठाकरेंचे फटकारे

कसलाच अनुशेष शिल्लक न ठेवता व्यंगचित्रातून आसूड ओढणाऱ्या राज ठाकरे यांनी यंदा बिनचेहऱ्याच्या जातीवादीय नेत्यांना फटकारलं आहे. त्याचवेळी ब्राम्हण, दलित, मराठ्यांना जातीपातीच्या चिखलातून बाहेर येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

१९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' किंवा २३ जानेवारीचं ‘गुजरात निवडणूक’ निकालांवरील व्यंगचित्रानंतर अजून बऱ्याच विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं नवं व्यंगचित्र समोरं आणलं आहे.

जातीयतेचं तेढ

भीमा कोरेगाव घटनेनंतर मराठा दलितांमध्ये तेढ निर्माण होऊ लागली. विशेषतः व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या जातीविरुद्ध तेढ निर्माण करणारे मॅसेजस फिरू लागले. या सगळ्यांवर राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे.

काय आहे व्यंगचित्रात?

मराठा, दलित, ब्राम्हण या सगळ्यांना मी एकत्र घेऊन लढलो आणि आज तुम्ही एकमेकांविरुद्ध लढताय? असा सवाल करताना छत्रपती शिवाजी महाराज या व्यंगचित्रात दाखवले आहेत. तर बिनचेहऱ्याचे काही जातीयवादी नेते आपली पोळी भाजण्यासाठी तुमचा वापर करून घेत असल्याचं समजावत या साऱ्यांना जातीवादाच्या चिखलातून बाहेर येण्याचं आवाहन राज यांनी व्यंगचित्रातून केलं आहे. या व्यंगचित्रातून जनतेनं बोध घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.


हेही वाचा-

शिवसेनेच्या 'स्वबळाच्या' घोषणेवर राज यांचे 'फटकारे'

गुजरातमध्ये राहुलच सरस...


पुढील बातमी
इतर बातम्या