Advertisement

गुजरातमध्ये राहुलच सरस...


गुजरातमध्ये राहुलच सरस...
SHARES

वो सिकंदर ही दोस्तो कहलाता है... हारी बाजी को जीतना जिसे आता है...! हे गाणं आणि त्यातील वास्तव राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून साकारल आहे. गुजरातमध्ये मोदी-शाहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचं आपल्या व्यंगचित्रातून दाखवून दिलं आहे.


राज ठाकरे पुन्हा सक्रिय

राज ठाकरे आपल्या फाटकाऱ्यांतून पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे अशाच एका फाटकाऱ्यातून त्यांनी आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्रातून अत्यंत मार्मिक भाष्य केलं आहे.


व्यंगचित्रातून मांडलं वास्तव

गुजरातमध्ये मोदी-शाहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचं आपल्या व्यंगचित्रातून दाखवून दिलं आहे. भाजपाने सरकार स्थापन केले यापेक्षा काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी सुधारली. गुजरातमध्ये पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा उंचावली हे वास्तव त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलं.


व्यंगचित्रातून राहुल यांचं कौतुक

या निवडणुकीने राहुल यांची सोशल मीडियावरील पप्पू ही प्रतिमा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी व्यंगचित्रात रेखाटलं. एरवी राज ठाकरे आपल्या भाषणांमधून राहुल गांधींची खिल्ली उडवतात पण यावेळी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी राहुल यांचं कौतुक केलं.

संबंधित विषय
Advertisement