Advertisement

शिवसेनेच्या 'स्वबळाच्या' घोषणेवर राज यांचे 'फटकारे'


शिवसेनेच्या 'स्वबळाच्या' घोषणेवर राज यांचे 'फटकारे'
SHARES

आपल्या वाक्चातुर्याने विरोधकांना हतबल करून सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने विरोधकांना घायाळ करू लागले आहेत. गुजरात निवडणुकीचा दाखल देत पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टार्गेट केल्यानंतर राज यांनी नव्या व्यंगचित्राद्वारे शिवसेनेच्या 'एकला चलो'च्या नाऱ्यावर टीका केली आहे.

नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी सभेत शिवसेनेने पुन्हा एकदा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अशी घोषणा अनेकदा करूनही सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेनेच्या या घोषणेवर राज यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे ओढले आहेत.

राज यांनी नवं व्यंगचित्र रेखाटून आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर बसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना सोडू? असा सवाल करत आहेत. त्यावर ‘अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला’ असं उत्तर मुख्यमंत्री त्यांना देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा