राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र- राज ठाकरे

सध्याच्या नाकर्त्या सरकारला राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडवून त्यावर निवडणूक लढवायची आहे, असा खळबळजनक आरोप पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेने आयोजित केलेल्या विक्रोळी महोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली.

पुन्हा सत्तेत येण्यासाठी

राज्यात बेरोजगारी, महागाईचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत. असं असताना या मुख्य मुद्द्यांपासून सर्वसामान्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे सरकार जाणीवपूर्वक लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे. धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली भडकवायच्या, निवडणुकीत मतं मागायची आणि पुन्हा सत्तेत यायचं असा एककलमी कार्यक्रम या नाकर्त्या सरकारने आखला आहे. त्यामुळे राम मंदिर व्हायलाच हवं, पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, असंही राज यांनी ठणकावून सांगितलं.

राम-हनुमानाची जात काय?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होता असं विधान नुकतंच केलं. त्यावर तोंडसुख घेताना राज म्हणाले आजपर्यंत कुणीही राम किंवा हनुमानाची जात काय होती? हे विचारलं नाही. पण काही मंडळी अशी विधानं करून जाती-धर्मांत आगी लावण्याचं कारस्थान करत आहेत. योगी मुख्यमंत्री झाल्यापासून एकदाही राज्यावर बोलले नाहीत.


हेही वाचा-

विरोधकांची बोलती बंद! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं हिंदीत भाषण

मनसेत भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून लांडे शिवसेनेत गेले- संदीप देशपांडे


पुढील बातमी
इतर बातम्या