Advertisement

मनसेत भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून लांडे शिवसेनेत गेले- संदीप देशपांडे

राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेत भ्रष्टाचाराला कधीच आणि कुठेही वाव नसतो. त्यामुळेच मनसेचे नगरसेवक असोत वा मनसेचे नेते कुणीही, कधीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेलं नाही. याउलट शिवसेनेत सहज भ्रष्टाचार करता येतो, असं दिसल्यानेच काही नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. लांडे यांच्या प्रकरणावरून हे सहजपणे दिसून येत आहे.

मनसेत भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून लांडे शिवसेनेत गेले- संदीप देशपांडे
SHARES

''कुर्ल्यातील चांदिवली परिसरातील भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत महापालिकेला 'मामा' बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध'', अशा मजकूराचा फ्लेक्स लावत मनसेने शिवसेनेचे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांच्यावर सोमवारी सकाळी निशाणा साधला. हाच मुद्दा उचलून धरत महापालिकेतील विरोधकांनी लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून आहे. मनसेत भ्रष्टाचार करता येत नव्हता म्हणून लांडेंनी शिवसेना जवळ केल्याचं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही लांडे आणि शिवसेनेवर खळबळजनक आरोप केला आहे.

कोडींत पकडण्याचा प्रयत्न

पूर्वाश्रमी मनसेचे नगरसेवक असलेले लांडे यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतील इतर ५ नगरसेवकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. मात्र याच लांडे यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मनसेनं ही संधी साधून लांडे आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले देशपांडे?

राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेत भ्रष्टाचाराला कधीच आणि कुठेही वाव नसतो. त्यामुळेच मनसेचे नगरसेवक असोत वा मनसेचे नेते कुणीही, कधीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेलं नाही. याउलट शिवसेनेत सहज भ्रष्टाचार करता येतो, असं दिसल्यानेच काही नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. लांडे यांच्या प्रकरणावरून हे सहजपणे दिसून येत आहे.

भ्रष्टाचार झालाच नाही

याप्रकरणी 'मुंबई लाइव्ह'ने लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणात कुठंही भ्रष्टाचार झाला नसल्याचं म्हणताना आपल्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार केवळ पक्षाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा-

दिलीप लांडे यांच्याविरोधात मनसेची फ्लेक्सबाजी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा