Advertisement

दिलीप लांडे यांच्याविरोधात मनसेची फ्लेक्सबाजी

'चांदिवली विधानसभेतील उद्यानाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत, महापालिकेला 'मामा' बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध', अशा प्रकारचा मजकूर लिहिती मनसेनं दिलीप लांडे यांच्यावर टीका केली आहे. हे फ्लेक्स ते राहत असलेल्या चांदिवली विभागात लावण्यात आले आहेत.

दिलीप लांडे यांच्याविरोधात मनसेची फ्लेक्सबाजी
SHARES

मुंबईतील कुर्ला चांदिवली परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांना जमीन वाटप प्रकरणातून टार्गेट करत मनसेने त्यांच्याविरोधात फ्लेक्सबाजी केली आहे. दिलीप लांडे यांना त्यांच्या विभागात आणि महापालिकेत 'मामा' या नावाने संबोधलं जात असल्याने याच नावाचा वापर करून मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे.

कारण काय?

'चांदिवली विधानसभेतील उद्यानाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत, महापालिकेला 'मामा' बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध', अशा प्रकारचा मजकूर लिहिती मनसेनं दिलीप लांडे यांच्यावर टीका केली आहे. हे फ्लेक्स ते राहत असलेल्या चांदिवली विभागात लावण्यात आले आहेत.

मनसेतून शिवसेनेत

दिलीप लांडे यांच्यावर आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप होत आहे. तसंच, दिलीप लांडे नुकतेच मनसेतून शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळं कुर्ला चांदिवली भागातील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्नावरून शिवसेनेवर देखील टीका होत आहे.हेही वाचा-

शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याची एक इंचही जागा देणार नाही- राज ठाकरे

सफाई कामगारांच्या संपामुळे मुंबईकरांची कचराकोंडी?Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा