तर रस्त्यावर फोडून काढू, मनसेच्या नेत्याचा BMC अधिकाऱ्यांना इशारा

आपत्कालीन परिस्थितीत देखील भ्रष्टाचार करून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमचं बारीक लक्ष आहे. एकदा का हे कोरोनाचं संकट गेलं की या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फोडून (mns leader sandeep deshpande warns corrupt officer of bmc ) काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. 

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडून कोरोनाची परिस्थिती हातळण्यात अक्षम्य कुचराई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडून सातत्याने होत आहे. कोरोना संकटकाळात सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एक तर आपल्याकडे हव्या त्या प्रमाणात कोरोना चाचणी होत नाहीत. चाचणी झाली, तर अॅम्ब्युलन्स मिळत नाहीत. अॅम्ब्युलन्स मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही. जागा मिळालीच तर सरकारी रुग्णालयातील परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. खासगी रुग्णालयात तर मनमानी बिल आकारत आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही रुग्णालयात खाट न मिळाल्याने एका वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचं सांगताना संदीप देशपांडे यांचे अश्रू अनावर झाले होते. 

हेही वाचा - तर, संजय राऊत यांच्या पाया पडेन, मनसेच्या ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

ही परिस्थिती सुधारली, कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलं, तर कार्यालयात येऊन पाया पडेल, असं आव्हान देखील संदीप देशपांडे यांनी सोनू सूद प्रकरणावरून टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं होतं. त्यापाठोपाठ आता संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

आपल्या मेसेजमध्ये संदीप देशपांडे लिहितात की, सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे, तुमच्या वर आमची करडी नजर आहे. हे करोना चे संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. असं म्हणत देशपांडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

हेही वाचा - नोकरी गेलीय? मनसेनं केलं ‘या’ नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन
पुढील बातमी
इतर बातम्या