Advertisement

नोकरी गेलीय? मनसेनं केलं ‘या’ नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ जारी करून नोकरी गेलेल्या तरूणांची मनसेतर्फे मदत करण्यात येईल, असं सांगितलं आहे.

नोकरी गेलीय? मनसेनं केलं ‘या’ नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन
SHARES

कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनमुळे तब्बल दोन ते अडीच महिने महाराष्ट्रासह देशभरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काही जणांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार लटकत आहे. तर काही जणांना पगार कपातीलाही सामोरं जाव लागत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अडचणीत (mns leader sandeep deshpande appeals to contact who lost their job during lockdown) आलेल्या तरूणांना मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ जारी करून नोकरी गेलेल्या तरूणांची मनसेतर्फे मदत करण्यात येईल, असं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी संदीप बोरकर यांच्या ९९२०३ ३४४४१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील केलं आहे.

हेही वाचा- रिक्षा-टॅक्सी संघटनांचं भाडेवाढीवर विचारमंथन? महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पुढाकार 

पॅकेजच्या नावाखाली ठेंगा

आपल्या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे म्हणाले, लाॅकडाऊनमुळे आपली अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. परिणामी लाखो मराठी मुलांच्या नोकऱ्या जाताहेत त्याचप्रमाणे अनेक उद्योगधंदेही बंद पडत चालले आहेत. अनेक मालकांना आर्थिक चणचण जाणवतेय, त्यांच्याकडे नोकरांना पगार द्यायला पैसे नाहीत. या अडचणीचा सामना करण्याऐवजी सरकार फक्त फेसबुकवर येतं गोडगोड बोलतं की तुमची नोकरी गेली नाही पाहिजे, केंद्र सरकारकडून २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर होतात. पण प्रत्यक्षात उद्योगधंद्यांना ठेंगा मिळतोय. मुलांच्या नोकऱ्या जात असताना सरकारकडून कुठलीही ठोस कारवाई संबंधित कंपन्यांवर केली जात नाहीय. 

डेटा गोळा करणार

त्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांचे उद्योगधंदे बंद पडलेत किंवा ज्यांच्या पगारात कपात झाली आहे. अशा सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपली माहिती द्यावी. जेणेकरून मनसेतर्फे सगळ्यांचा डेटा जमा करण्यात येईल. अशा कुठल्याही प्रकारचा सर्व्हे सरकारकडून करण्यात येत नाहीय. तसंच ज्या कंपनी चालकांना कामासाठी माणसांची गरज लागणार आहे, त्यांनी देखील या क्रमांकावर संपर्क साधावा. मनसेकडे असलेला डेटा त्यांना पुरवण्यात येईल तसंच नोकरीसाठी मदत करण्यात येईल. ज्यांना कर्ज मिळत नाही, बँका ज्यांना उभं करत नाही, अशांनी देखील या क्रमांकावर संपर्क साधावा. या माहितीच्या आधारे मनसे तरूणांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, असं संदीप देशपांडे म्हणाले.

हेही वाचा- मग फेसबुक लाइव्ह इंग्रजीत का नाही? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा