मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरला चर्चेगेट स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचं आयोजन करण्यासाठी मनसेकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून त्यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी एक बैठक देखील घेतली. फक्त आकडा म्हणून नको, तर समस्या म्हणून मुंबईकरांनी या मोर्चात सामील व्हावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी यापूर्वीच केलं आहे.
या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेकडून मुंबई पोलिसांना अर्ज देण्यात आला आहे. रेल्वेसेवेवरील राग व्यक्त करण्यासाठी, राज यांच्या नेतृत्वाखाली ५ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजता मेट्रो सिनेमा ते चर्चगेट अशा मोर्चाला सुरूवात होणार आहे. या मोर्चासाठी मनसे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमधील ताकद पणाला लावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
उपनगरीय एकता संस्थेच्या सदस्यांनी राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेत मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला.
रेल्वे प्रवाशांचे रडगाणे नेहमीचेच असल्याने आम्ही संघटनेच्या माध्यमातून रेल्वेपुढे पत्राद्वारे ज्या व्यथा मांडतो, त्याची साधी दखलही कुणी घेत नाही. यासंदर्भात आम्ही संघटनेच्या वतीने राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन देण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीद्वारे आम्ही सर्वसामान्य प्रवाशांच्या तक्रारी त्यांच्यापढे मांडणार आहोत.
आमच्या संघटनेचा या मोर्चाला शंभर टक्के पाठिंबा असून मुंबई, उपनगरासह ठाणे, दिवा, कळवा, मुंब्रा, आसनगाव येथील सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपनगरीय एकता संस्थेचे महासचिव अनिकेत गवंडी यांनी दिली.
हेही वाचा -
व्यंगचित्रातून राज यांची मोदींवर पुन्हा टीका
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)