Advertisement

व्यंगचित्रातून राज यांची मोदींवर पुन्हा टीका


व्यंगचित्रातून राज यांची मोदींवर पुन्हा टीका
SHARES

फेसबुक पेज लॉन्च केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींना पुन्हा टार्गेट केलं आहे.

'इतकं खोटं बोलणारं सरकार आणि इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान मी कधीच पाहिले नाही', अशी टीका राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर, आज त्यांनी व्यंगचित्रातून पुन्हा त्यांच्यावर टीका केली आहे.

याआधी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची, थापा मारण्यावरून खिल्ली उडवली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी, दाऊद मोदींना फरफटत आणतोय, पण आपणच त्याला पाकमधून फरफटत आणल्याचा दावा मोदी करताहेत, असं व्यंगचित्र काढलं होतं. हे असंच चित्र निर्माण करून मोदी सरकार २०१९च्या निवडणुका लढवणार असल्याचा टोला त्यांनी राज ठाकरे यांनी लगावला होता.


हेही वाचा - 

मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही - राज

राज ठाकरेंची फेसबुकवर पहिली राजकीय भूमिका - बाबासाहेबांचे स्मारक नको, ग्रंथालय असावे!



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा