महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह इतर नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्याची शिखर बँक म्हणून ओळख जाते. या बँकेने केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
या प्रकरणी नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले.
हेही वाचा-
बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासहीत ५० जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश
पलटवार! आता मनसेनं पाठवली ‘ईडी’ला नोटीस