देशद्रोहाचा आरोपी शरजीलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, फडणवीसांची सरकारवर टीका

Sharjeel Imam's Facebook
Sharjeel Imam's Facebook

देशद्रोहाचा आरोप असलेला शरजील इमाम (sharjeel imam) याच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदानावर (azad maidan) घोषणाबाजी करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे. या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला (shivsena) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून दुसरीकडे मुंबई पोलीस (mumbai police) या घोषाणाबाजी करणाऱ्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा- रंग बदलणारा सरडा कोण? शेलारांनीच आधी आत्मपरिक्षण करावं- उदय सामंत

सीएए (caa) आणि एनआरसी (nrc) विरोधात शरजीलने एक भाषण केलं होतं. या भाषणादरम्यान त्याने ५ लाख लोक एकत्र आल्यास आसाम आणि ईशान्य भारत भारतापासून वेगळा करता येईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरजीलविरोधात (sharjeel imam) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसानंतर त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. शरजील हा शाहीन बाग (shaheen bagh) इथं सुरू असलेल्या महिला आंदोलनाचा म्होरक्या असल्याचंही मानलं जात आहे. 

मूळचा बिहारचा असलेल्या शरजीलने मुंबई आयआयटीतून (mumbai iit) कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. पदवीनंतर २ वर्षे बेंगळुरूतील एका सॉफ्टवेअर कंपनीत तो डेव्हलपर म्हणून कामाला होता. त्यानतंर २०१३ मध्ये जेएनयूमध्ये आधुनिक इतिहासात त्याने मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर एमफील आणि पीएचडीसुद्धा केली.

काही दिवसांपूर्वी LGBT आंदोलना दरम्यान सर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आझाद मैदानात त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. या घोषणाबाजीवरून भाजप नेत्यांनी राज्य सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी या घोषणाबाजीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मुंबईत हे काय चाललंय आणि महाराष्ट्र सरकार हे कसं काय खपवून घेतंय असा सवाल फडणवीसांनी ट्विटरवरून विचारला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या