Advertisement

रंग बदलणारा सरडा कोण? शेलारांनीच आधी आत्मपरिक्षण करावं- उदय सामंत

कोण रंग बदलतं आणि कोण सरडा आहे, हे बोलण्याआधी ​भाजप नेते आमदार आशिष शेलार​​​ यांनी आत्मचिंतन करावं, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (higher education minister uday samant) यांनी शेलार यांना प्रतिउत्तर दिलं.

रंग बदलणारा सरडा कोण? शेलारांनीच आधी आत्मपरिक्षण करावं- उदय सामंत
SHARES

कोण रंग बदलतं आणि कोण सरडा आहे, हे बोलण्याआधी भाजप नेते आमदार आशिष शेलार (bjp leader ashish shelar) यांनी आत्मचिंतन करावं, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (higher education minister uday samant) यांनी शेलार यांना प्रतिउत्तर दिलं आहे. 

हेही वाचा- आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, आव्हाडांचं शेलारांना प्रत्युत्तर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली होती. “शिवसेना (shiv sena) सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. सीएए (caa) हा केंद्र सरकारचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केलं होतं. 

त्यावर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रीया व्यक्त करताना उदय सामंत (uday samant) म्हणाले की, कोण सरडा आहे, कोण रंग बदलतो, हे बोलण्याआधी शेलारांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, मागच्या सरकारमध्ये एकत्र बसलेले असताना अचानक कुणी रंग बदलले ते तपासून पहा, असं सामंत म्हणाले.

हेही वाचा- तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

या टीकेवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी आक्षेप घेतला. भाजपचे नेते असलेल्या आशिष शेलारांना (ashish shelar) असं वक्तव्य करणं शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे. आशिष शेलार जर बाप काढत असतील, तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.   

दरम्यान, मी कुणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. तरीही माझ्या टीकेमुळे कुणाला वाईट वाटलं असलं, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माझ्या मतावर मी अजूनही ठाम आहे, असा खुलासा आशिष शेलार यांनी केला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा