Advertisement

आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, आव्हाडांचं शेलारांना प्रत्युत्तर

आशिष शेलार जर बाप काढत असतील, तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, आव्हाडांचं शेलारांना प्रत्युत्तर
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायदा (caa) महाराष्ट्रात लागू करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि भाजप नेते आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांच्यात जुंपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. आशिष शेलार जर बाप काढत असतील, तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची सूचना

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले, “शिवसेना (shiv sena) सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. सीएए (caa) हा केंद्र सरकारचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केलं होतं.

या टीकेवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी आक्षेप घेतला. भाजपचे नेते असलेल्या आशिष शेलारांना (ashish shelar) असं वक्तव्य करणं शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे. आशिष शेलार जर बाप काढत असतील, तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

दरम्यान, मी कुणावरही वैयक्तीक टीका केली नाही, तरीसुद्धा कुणाला वाईट वाटलं असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिलं आहे.

हेही वाचा- तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) सीएए आणि एनआरसीबाबत (caa and nrc) आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शिवसेनेने (shivsena) काँग्रेस (congress), राष्ट्रवादीसोबत (ncp) मिळून महाविकास आघाडीत सरकार (maha vikas aghadi) स्थापन केलं असलं, तरी शिवसेनेने हिंदुत्व (hindutva) सोडलेलं नाही. सीएएमुळे कोणाच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही. मात्र राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे केवळ मुस्लीम समुदायालाच नव्हे, तर हिंदुंनासुद्धा नागरिकत्व सिद्ध करणं जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एनआरसीला विरोध दर्शविला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा