वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे नाव वीर सावरकरांच्या नावावर ठेवा : देवेंद्र फडणवीस

आगामी काळातही स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यसैनिक  वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

काय आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मागण्या?

देवेंद्र फडणवीस यांनी 13 मार्च रोजी पत्र लिहून कोस्टल रोड, सी लिंक आणि ट्रान्स हार्बर लिंकसाठी नवीन नावांची मागणी केली होती. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचे नाव देण्यात यावे आणि मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंकला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशा दोन मागण्याही या पत्रात करण्यात आल्या आहेत.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजाला सर्व सुविधा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने सुनावलं

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या