Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत गोंधळात टाकणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
SHARES

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत गोंधळात टाकणारा असल्याचे मत व्यक्त केले, असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले आहे. ते शुक्रवारी (12 मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशावेळी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यात त्यांची भाषा वाचल्यानंतर त्यांची सुटका झाली की अटक झाली हे कळत नाही. ही भाषा किती क्लिष्ट आहे."



हेही वाचा

विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने सुनावलं

उद्धव ठाकरेंनी राजिनामा दिला नसता तर त्यांनाच मुख्यमंत्री केले असते : सुप्रिम कोर्ट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा